Uncategorized

मराठा आरक्षण आंदोलन : उद्या शनिवारी पंढरपूरच्या सर्व रस्त्यावर रास्ता रोको

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाज आक्रमक

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ : भोसे चौकात दोन तास वाहतूक ठप्प
पंढरपूर :- मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या शनिवार ( दि. १७ ) रोजी पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्व मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आज सकाळी १० वाजल्यापासून पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्व मार्गावर रास्ता रोको आंदोलन होणार आहे, अशी माहिती पंढरपूर शहर आणि तालुका सकळ मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली.
दरम्यान शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून १२ वाजेपर्यंत मराठा समाजाने पंढरपूर – वेणेगाव मार्गावर भोसे चौकात रास्ता रोको केले. यावेळी भोसे आणि परिसरातील शेकडो मराठा समाज बांधव आंदोलनात सहभागी झाल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.

मराठा आरक्षण मिळावे यासाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरु असून त्यांच्या समर्थनार्थ पंढरपूर शहर आणि तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन जाहीर केले आहे. शनिवारी सकाळी १० वाजल्यापासून पंढरपूर शहरात येणाऱ्या सांगोला मार्गावरील चौथा मैल येथे, मंगळवेढा मार्गावरील गोपाळपूर चौक येथे, सोलापूर आणि बार्शीकडून येणाऱ्या मार्गावर नदी पलीकडे तीन रास्ता चौकात, टेम्भूर्णी मार्गावर अहिल्यादेवी चौकात, तसेच पुणे आणि सातारा मार्गावर वाखरी येथे, कराड रोडवर टाकळी चौकात रास्ता रोको करण्याचे बैठकीत निश्चिती करण्यात आले. या सर्व ठिकाणी त्या – त्या मार्गावरील आणि लगतच्या गावातील मराठा बांधवानी आंदोलनात सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले.

येथील तहसील कार्यालर्यासमोर झालेल्या या बैठकिस जेष्ठ नेते सुभाष भोसले, दीपक वाडदेकर, संदीप मांडवे, किरण घाडगे, स्वागत कदम, संतोष कवडे, नागेश भोसले, सतीश गांडूळे, शंकर सुरवसे, सुमित शिंदे, शनी घुले, सुनिल पाटील, माउली आटकळे, अविनाश मोरे, मोहन अनपट. धनराज मोरे, अण्णा लटके आदी उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close