छोरीया कंपनी फसवणूक प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय.
छोरीया कंपनीच्या फसवणूक गुन्ह्याबाबत मे. न्यायालयाने काढली कारणे दाखवा नोटीस
पंढरपूर :- छोरीया कंपनीच्या फसवणुकी प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर अनंता बाबू कैकाडी व सागर अनंता कैकाडी यांच्यासह अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या विरोधात अनंत कैकाडी आणि सागर कैकाडी यांनी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये रिव्हीजन दाखल केले होते. तसेच दाखल गुन्ह्याला स्थगिती देण्याची मागणी केली होती. यावर सुनावणी होऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश एम बी लंबे यांनी अर्जदार यांचे वकील अँड अमोल देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून तात्काळ फिर्यादी व सरकारी पक्षास केस कामी स्थगिती का देऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस काढून सदर रिव्हीजन अर्जास म्हणणे देण्याचा आदेश मे न्यायालयाने पारित केला आहे. तसेच आरोपी सागर कैकाडी यास अंतरिम अटक पूर्व जामीन देखील मंजूर केलेला आहे.
याबाबत हकीकत अशी की, छोरीया कंपनीचे भागीदार कन्हैया देवीलाल जैन यांनी पंढरपूर न्यायालया मध्ये अनंता बाबू कैकाडी व सागर आनंता कैकाडी व इतर 11 जणांविरुद्ध वाखरी येथील जमीन गट नंबर ४१७/१, ४१७/२, ४१७/३ एकूण जमीन क्षेत्र ३१ हेक्टर १ आर या जमिनीचे खोटे दस्त करून फिर्यादी यांची फसवणूक केल्याबाबत व वरील नमूद सर्व आरोपींनी इतर आरोपींशी संगनमत करून छोरीया डेव्हलपमेंट कंपनीच्या साइटवर दरोडा टाकून साहित्याची नासदुस केली अशा आशयाची फिर्याद पंढरपूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फिर्यादी यांनी दाखल केली होती सदर फिर्यादीची सुनावणी होऊन दिनांक ०३/०२/२०२४ रोजी न्यायालयाने सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश पारित केला त्याप्रमाणे पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सदर आरोपी विरुद्ध होणार रजि नंबर १४/२०२४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता न्यायालयाने केलेल्या सदरच्या आदेशाविरुद्ध आरोपी अनंता बाबू कैकाडी व सागर आनंता कैकाडी यांनी जिल्हा व सत्र न्यायालय पंढरपूर येथे रीव्हिजन दाखल केले होते व सदर रिव्हीजन अर्जाच्या कामी यातील आरोपी यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पंढरपूर यांनी गुन्हा दाखल करण्याच्या केलेल्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली असता मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश एम बी लंबे साहेब यांनी अर्जदार यांचे वकील अँड अमोल देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून तात्काळ फिर्यादी व सरकारी पक्षास केस कामी स्थगिती का देऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस काढून सदर रिव्हीजन अर्जास म्हणणे देण्याचा आदेश मे न्यायालयाने पारित केला
त्याचबरोबर सदर गुन्ह्याच्या कामी यातील आरोपी सागर आनंता माने यास मे न्यायालयाने अंतरिम अटक पूर्व जामीन देखील मंजूर केलेला आहे
सदर केस कामी आनंता बाबू कैकाडी सागर आनंता कैकाडी यांच्या वतीने अँड अमोल देसाई, अँड राजेंद्रप्रसाद पुजारी, अँड सत्यम धुमाळ, अँड प्राजक्ता फुगारे यांनी काम पाहिले.