राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष पदी अडव्होकेट सुकेशनी शिर्के – बागल यांची नियुक्ती.
पंढरपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या पंढरपूर तालुका अध्यक्ष पदी अडव्होकेट सुकेशनी शिर्के – बागल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळूंखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. शिर्के यांनी यापूर्वी पंढरपूर बार असोसिएशनचे पद देखील भूषवले आहे. शिर्के यांच्या नियुक्ती मुळे पक्ष संघटना वाढीला मोठा फायदा होणार आहे. तसेच महिलांना कायद्याचे मार्गदर्शन, सल्ला देखील मिळणार असल्याचे मत माजी आमदार दीपक आबा साळूंखे पाटील यांनी व्यक्त केलं.
यावेळी महीला आघाडी जिल्हाध्यक्ष वर्षाताई शिंदे, विद्यार्थी काँग्रेसचे संकेत ढवळे, पंढरपूर शहर अध्यक्ष दिगंबर सूडके, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ माने, नवनाथ बागल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शिर्के यांच्या निवडीचे सर्व स्थरातून स्वागत होत आहे.