पोलीसांची अवैध गुटखा, माव्यावर कारावाई ; अन्न औषध प्रशासन पडले उघडे
सिंहासन टाईम्सचा दणका
पंढरपूर :- मागील काही महिन्यापासून पोलीस प्रशासनाने गुटख्याबाबत सक्त कारवाई सुरु केली आहे. यामुळे गुटखा, मावा विक्री करण्याचे प्रमाण कमी प्रमाणात आले आहे. मात्र पंढरपुरात अनेकजण गुटखा होलसेल दरात करताना आढळून येत आहे. याचप्रमाणे शहर पोलीसांनी तीन गुटखा बाळगणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करुन ५ लाख ७६ हजार ४३५ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. पुन्हा पोलिसांनीचं कारवाईत पुढाकार घेतल्याने अन्न आणि औषध प्रशासन उघड्यावर पडले आहे.
पंढरपुर शहरात गुटखा विक्री बंद केल्याबाबत नागरीकांमधून समाधान व्यक्त होत होते. त्याचबरोबर चोरुन गुटखा विक्री करणाऱ्यांवर पालक वर्गातून नाराजी व्यक्त होत होती. अशातच शहरात तीन ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री होत असल्याची माहीती पोनि विश्वजीत घोडके यांना मिळाली. त्यांनी तत्काळ संबंधीत ठिकाणी सपोनि. प्रकाश भुजबळ, पोलीस कर्मचारी श्रीकांत घुगरकर, नितीन जगताप, नागनाथ कदम, सिरमा गोडसे, शहाजी मंडले, समाधान माने असे पथक पाठवले. यानंतर संजय पांडुरंग होनराव यांच्या मे. राजलक्ष्मी जनरल स्टोअर्स दुकानातून ७२ हजार ५१५ रुपये किमतीचा विमल व इतर कंपनीचा सुगंधी तंबाखू पान मसाला साठा मिळाला. अजिज अब्दुल तांबोळी यांच्याकडून भोसले चौकातून ५ लाख १ हजार ३२० रुपये किमतीचा विमल व इतर कंपनीचा सुगंधी तंबाखू पान मसाला साठा मिळाला. सागर उत्तम अभंगराव (रा. जुनी पेठ, कोळे गल्ली, पंढरपूर) याच्याकडून २६०० रुपये किमतीचा सुगंधी पान मसाला मावा साठा मिळाला. असा एकूण ५ लाख ७६ हजार ४३५ रुपयांचा साठा जप्त केला आहे. वरील तिघांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यु. एस. भुसे तसेच पंढरपूर शहर पोलिस स्टेशन यांच्या समवेत खालील नमूद इसमांच्या ताब्यातून प्रतिबंधित अन्न पदार्थाचा गुटक्याचा विक्रीहेतु साठा ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणले.