सोलापूर लोकसभेसाठी भाजपच्या जयश्री खरात यांची मागणी.
दोन महिला उमेदवारांमध्ये लढतीची शक्यता.
पंढरपूर :- सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे भाजपने योग्य व सक्षम उमेदवाराची चाचपणी सुरु केली आहे. इच्छुकांमध्ये अमर साबळे, राम सातपुते, लक्ष्मण ढोबळे, यांची नावे चर्चेत असताना आता पंढरपूरच्या जयश्री खरात यांनाही पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. जयश्री खरात यांनी आज पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना उमेदवारी बाबत भूमिका स्पष्ट केली.खरात यांना उमेदवारी मिळाल्यास दोन महिलांमध्ये लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जयश्री खरात म्हणाल्या की, मी गेल्या अनेक वर्षापासून भाजपचे सक्रीयपणे काम करत आहेत. मुंबईत देखील पक्ष वाढीसाठी काम केले आहे. पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर, मोहोळ या भागात देखील पक्ष वाढसाठी आणि महिला संघटनासाठी काम केले आहे. पक्षाच्या माध्यमातून अनेक महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मागील वर्षभरापासून सोलापूर व पंढरपूर भागात येवून तेथील लोकांचे प्रश्न जाणून घेवून ते सोडवण्याचे काम केले आहे. पक्षातील एक निष्ठावंत महिला म्हणून पक्षाने संधी दिली तर त्याचे सोने करु असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. उमेदवारी बाबत पक्षातील वरिष्ठांकडे मागणी केली आहे. त्यांनी ही सकारत्मकता दर्शवली आहे. संधी मिळाली तर आनंदच आहे. शेवटी पक्ष जो निर्णय घेईल त्या पध्दतीने प्रामाणिकपणे काम करणार असल्याचेही जयश्री खरात यांनी स्पष्ट केेले. यावेळी भाजप महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज त्यांनी कामगार मंत्री सुरेश खाडे यांचीही भेट घेवून चर्चा केली.