खेडभाळवणीत महार वतनातील जमिन नांगरण्यास विरोध ; सरपंचांविरोधात ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल.
पंढरपूर :- खेड भाळवणी (ता. पंढरपूर ) येथील महार वतनातील जमीन नांगरत असताना सरपंचासह इतर तिघांनी येऊन जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून त्यांच्याविरूद्ध केलेल्या तक्रारीनुसार ऍट्रासिटी कायद्यानुसार पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
यासंदर्भात ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादेनुसार, सुनील दशरथ बाबर ( रा. महाळुंग, ता. माळशिरस ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता खेडभाळवणी ( ता. पंढरपूर ) येथील गट नंबर २५१ / १ मधील महार वतनाची जमीन नांगरत होते. यावेळी सरपंच संतोष साळुंखे, सत्यवान साळूंखे, कुलदीप साळुंखे, गणेश साळुंखॆ या चौघांनी तेथे येऊन मारुती मंदिराची जमीन का नांगरत आहात असे विचारून जमीन नांगरण्यास विरोध केला. त्यानंतर हि जमीन आमची महार वतनाची असून नावे लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केल्याचे सांगितले. त्यानंतर वरील चौघांनी सुनील बाबर यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या महिलानांही शिव्या देण्यास सुरुवात केली. सत्यवान महादेव साळुंखे यांनी जातीवाचक शिव्या दिल्या, अशा प्रकारची फिर्याद दिली आहे. त्यानुसार सत्यवान साळुंखे, संतोष साळुंखे, कुलदीप साळुंखे, गणेश साळुंखे यांच्या विरोधात एट्रोसिटी कायद्यानुसार पंढरपूर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले हे करीत आहेत.