पंढरपुरात पुन्हा गुटखा पंडित चे राज्य
प्रशासनाच्या नाकाखाली सुरू आहे गुटखा, मावा विक्री
पंढरपूर :- फेब्रुवारी महिन्यात पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागात अचानकपणे मावा , गुटखा विक्री बंद करण्यात आली होती. मात्र अनेक मोठ्या घडामोडींनंतर मासिक टेंडर काढून पुन्हा गुटख्याचा बाजार सुरू झाला. आठच दिवसात पंढरपूर शहर पोलिस आणि अन्न आहे औषध प्रशासनाने गुटखा तस्करीवर मोठी कारवाई केली. मात्र आता पुन्हा एकदा गुटखा पंडित ने तोंड वर काढले आहे. प्रशासनाच्या नाकाखाली टपरी टपरीवर, गावागावात गुटखा, प्रतिबंधित तंबाखू, सुपारी पोहोच होवू लागली आहे. या गुटखा पंडित सोबत अनेक हस्तक जोडले गेले आहेत. या गुटखा पंडितवर आणि त्याच्या हस्तकांवर यापूर्वी देखील पोलिसांनी छापेमारी केली आहे. मात्र आता पुन्हा या गुटखा पंडितने आपला व्यवसायाचे जाळे पंढरपुरसह सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर पसरवण्यात सुरावत केली आहे.
अवैधरित्या गुटखा, मावा व्यावसायिक आता राजकीय पाठबळ घेण्याच्या तयारीत.
गुटखा पंडीतच्या दादागिरीला आवर घालावा यासाठी पंढरपूर शहरातील पान टपरीधारकांनी एक मोठ्या नेत्याला साकडे घातले आहे. गुटखा , पान मसाला, प्रतिबंधित तंबाखू आणि सुपारीचा सगळा माल आपल्याकडूनच घेण्यासाठी गुटखा पंडित जबरदस्ती करत असल्याची तक्रार अवैधरित्या गुटखा, मावा विक्रेत्यांनी केली आहे. अवैधरित्या गुटखा , मावा विक्री करणारे आता राजकीय पाठबळ घेण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. असे झाल्यास पंढरपूरसह जिल्ह्यात गुटखा पंडितची दहशत असणार आहे. आता यावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.