गणपतीपुळे येथील समुद्रात बुडून पंढरपुरातील एकाचा मृत्यू. तीन जणांना वाचवण्यात यश.
दुचाकी वर चार मित्र गेले होते समुद्र किनारी पर्यटनाला.
चार मित्र दुचाकीवर गणपतीपुळे येथे समुद्रात पोहायचा आनंद घेण्यासाठी गेले अन् पाण्यात बुडाले… पंढरपुरातील एकाचा मृत्यू तर सोलापूरचे तीन वाचले…
पंढरपूर : सोलापूर आणि पंढरपूर येथील चार मित्र दुचाकीवर गणपतीपुळे येथे समुद्र किनारी फिरण्याचा आनंद लुटायला गेले. मात्र काळाला वेगळच असं मान्य होतं ते चारही मित्र समुद्राच्या पाण्यात वाहून गेले. मात्र त्यातील तिघे वाचले तर एकाच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अजित धनाजी वाडेकर (२५, रा. इसबावी परिचारक नगर, पंढरपूर, जि. साेलापूर) यांचा मृत्यू झाला.
अजय बबन शिंदे (२३), आकाश प्रकाश पाटील (२५), समर्थ दत्तात्रय माने (२४, सर्व रा. सोलापूर) व अजित धनाजी वाडेकर (२५, सध्या रा. इसबावी परिचारक नगर, पंढरपूर, जि. साेलापूर) हे चौघे जवळचे मित्र आहेत. अजित वाडेकर हा मागील दोन वर्षांपूर्वी पंढरपूर येथे मामाच्या गावाला राहायला आला होता. त्याचे मामाच्या पोरी सोबत सव्वा वर्षांपूर्वी लग्न झाले. तो दुचाकी वाहने दुरुस्ती करण्यात सराईत मिस्त्री होता. यामुळे त्याला दुचाकी वर फिरण्याच्या आवड होती.
शुक्रवारी दोन दुचाकी वर चौघे मित्र गणपतीपुळ्याला निघाले. रविवारी गणपतीपुळे येथील समुद्रात होण्याचा आनंद घेण्यासाठी गेले. मात्र समुद्राच्या लाटांनी चौघांना आत खेचून नेले. खाेल समुद्रात बुडत असताना त्यांना ठिकाणचा सुरक्षा रक्षकांनी वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अजय शिंदे, आकाश प्रकाश पाटील आणि समर्थ माने यांना वाचविण्यात यश आले आहे. तर या दुर्घटनेत अजित धनाजी वाडेकर (२५, रा. इसबावी परिचारक नगर, पंढरपूर, जि. साेलापूर) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
घरात माहित नाही
समुद्रात पोहताना अजित वाडेकर यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याबाबतची माहिती त्यांच्या घरच्यांना रविवारी संध्याकाळ पर्यंत माहिती नव्हती.