वारकरी साहित्य परिषद प्रत्येक गावात स्थापन करणार महिला हरिपाठ मंडळ.
वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील यांचा पुढाकार.
पंढरपूर:- वारकरी साहित्य परिषद सोलापूर जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ह.भ.प. परशूराम महाराज डोंबे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार 8 जून रोजी संत ज्ञानेश्वर मंदिर पंढरपूर येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या गाव तेथे हरिपाठ मंडळ याची माहिती देण्यात आली. प्रत्येक गावात प्रत्येक महिलांनी रोज हरिपाठाचे गायन करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक गावात वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हरिपाठ मंडळ स्थापन करण्याचे ठरले. प्रत्येक गावातील महिला हरिपाठ मंडळातील २५ महिलांना साडी वाटप करण्यात येणार आहे.
या बैठकीमध्ये सौ. राणी कोळी यांची सोलापूर महिला जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच सौ.महानंदा शिंदे यांची पंढरपूर तालुका महिला अध्यक्ष निवड करण्यात आली. तसेच मारुती शंकर मोरे यांची पंढरपूर तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी बार्शी तालुक्याचे तालुका अध्यक्ष ह.भ.प. रामलींगमहाराज पवार तसेच बार्शी तालुक्याच्या महिला तालुका अध्यक्ष सौ.सुप्रभा डोकेताई व ह.भ.प.संतोषमहाराज पवार हे उपस्थित होते.