Uncategorized

खासदार झाल्यानंतर पहिल्याच मेळाव्यात भालके समर्थक पंढरपूरकरांचा प्रणिती शिंदे यांना धक्का.

आक्रमक भालके समर्थकांसमोर खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली दिलगिरी

काँग्रेसच्या कृतज्ञता मेळाव्यात गटबाजी उघड;
प्रणिती शिंदेच्या बॅनरवर छायाचित्र नसल्याने भालके समर्थकांची घोषणाबाजी

पंढरपूर :- काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे यांनी आज पंढरपुरात आयोजित केलेल्या पहिल्याच कृतज्ञता मिळाव्यात अंतर्गत गटबाजी असल्याचे उघड झाले. खासदार प्रणिती शिंदे यांच्या बॅनरवर कै. आमदार भारत भालके व त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांचे छायाचित्र नसल्याने भालके समर्थक आक्रमक झाले होते. भालके समर्थकांच्या आक्रमणापुढे आक्रमक महिला नेत्या म्हणून ओळख असणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. त्यामुळे खासदार झाल्यानंतर पहिल्याच मेळाव्यात खासदार प्रणिती शिंदे यांना भालके समर्थकांचा धक्का पाहायला मिळाला.

आज काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने पंढरपूर मधील मतदारांचे आभार मानण्यासाठी कृतज्ञता मेळावा आणि सहभोजनाचे आयोजन केले होते. या मेळाव्याला नूतन खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सुविद्य पत्नी उज्वलाताई शिंदे, भगीरथ भालके, प्रकाश तात्या पाटील उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीमध्ये पंढरपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस किंवा महाविकास आघाडीला एकही सक्षम नेता प्रचार करण्यासाठी नव्हता. या काळात भगीरथ भालके यांनी बी आर एस पक्षाची साथ सोडत काँग्रेसच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांचा तन-मन धनाने प्रचार केला. त्यांना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून 45 हजार मतांची आघाडी मिळवून दिली. असे असताना देखील कृतज्ञता मिळाव्यामध्ये चक्क स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांचाच फोटो नसल्याने भालके समर्थक कमालीचे आक्रमक झाले. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिता ताई शिंदे यांच्यासमोरच त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. निवडणुकीच्या प्रचारात स्वर्गी आमदार भारत नाना भालके यांचे गुणगान गाणाऱ्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना निवडून आल्यानंतर स्वर्गी आमदार भारत नाना भालके आणि भगीरथ दादा भालके यांचा विसर पडल्याचा आरोप यावेळेस भालके समर्थकांनी केला.
संतप्त झालेल्या भालके समर्थकांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे निवडून आल्या आहेत. त्यांच्या या विजयामध्ये पंढरपूरकरांचा मोठा वाटा आहे. मेळाव्याच्या निमित्ताने पंढरपूर शहरात व कार्यक्रमाच्या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र या बॅनरवर कै.आमदार भारत भालके व त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांचे छायाचित्र छापण्यात आले नव्हते त्यामुळे भालके समर्थकांनी खासदार प्रणिती शिंदे यांना थेट जाब विचारत घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
अखेर खासदार शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केल्या नंतर कार्यकर्ते शांत झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close