Uncategorized
आमदार बबनदादा शिंदे आणि विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या शरद पवार पक्षात प्रवेशाला आणि माढ्यातून उमेदवारीला पदाधिकाऱ्यांचा विरोध.
लोकसभा निवडणुकीत विरोध करणारे नेते पक्षात आले तर आम्ही पक्ष सोडू संजय कोकाटे यांचा इशारा
पंढरपूर :- माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे हे पुन्हा शरद पवार गटात येण्यास इच्छुक असतानाच शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मात्र बबन दादा शिंदे यांच्या उमेदवारीला व पक्षप्रवेशाला विरोध केला आहे बबन शिंदे हे शरद पवार गटात येणार असतील तर आम्ही दुसऱ्या पक्षात असू असा थेट इशाराच माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संजय कोकाटे यांनी दिला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अभिजीत पाटील व माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी शरदचंद्र पवार पक्षाच्या विरोधात काम केले होते. तर अभिजीत पाटील यांनी ऐनवेळी शरद पवारांची साथ सोडून भाजपला पाठिंबा दिला होता .
लोकसभा निवडणुकीनंतर आमदार बबन शिंदे हे अलीकडेच शरद पवार यांना भेटले होते . लोकसभेच्या निवडणुकीनंतर आमदार बबन शिंदे व अभिजीत पाटील हे दोन्हीही नेते विधानसभेसाठी शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहेत. अशातच आता माढ्यातील शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मात्र आमदार बबन शिंदे व अभिजीत पाटील यांच्या पक्षप्रवेशाला व उमेदवारीला तीव्र विरोध केला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे आमदार बबन शिंदे आणि अभिजीत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातोय.