मालकी हक्काच्या जमिनीबाबत संभ्रम निर्माण केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा भाजपा तालुका अध्यक्ष भास्कर कसगावडे यांचा इशारा….
वादग्रस्त गटाचे खरेदी - विक्रीचे व्यवहार सहाय्यक दुय्यम निबंधकांनी केले बंद
पंढरपूर :- पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीतील गट क्रमांक 14 /1अ/2/अ ही जागा माझ्या खाजगी मालकीची आणि वहिवाटीची आहे. माझी बदनामी करण्याच्या हेतूने राजकीय हेतूने या जागेबाबत संभ्रम निर्माण केला आहे. तरी चुकीचा आरोप करणारे आरपीआयचे पदाधिकारी दीपक चंदनशिवे यांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे यांनी दिला आहे.
कासेगाव येथील वरील गट क्रमांक च्या जागेवर स्टेडियमसाठी पंढरपूर प्राधिकरणामध्ये आरक्षण आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दीपक चंदनशिवे यांनी तहसीलदार आणि सहाय्यक निबंधक पंढरपूर यांना दिला होता. या विरोधात भास्कर कसगावडे यांनी आता कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. कासेगाव हद्दीतील ही जमीन खाजगी स्वरूपाची आहे. पंढरपूर विकास प्राधिकरण जाहीर होण्यापूर्वी या जमिनीचे खरेदीचे रीतसर व्यवहार झालेले आहेत. त्यामुळे फक्त राजकीय हेतूने सदरचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे आपण लवकरच कायदेशीर कारवाई करणार असल्याचे कसगावडे यांनी सांगितले.
याबाबत कसगावडे यांनी मात्र संबंधित जागेची कागदपत्र पुढे आणली नसल्याने दीपक चंदनशिवे यांची बाजू खरी की भास्कर कसगावडे यांची बाजू खरी याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान या गटातील तीन प्लॉट विक्री झाली आहे. या गटाबाबत तक्रार आल्याने या गटाचे खरेदी विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पंढरपूरचे साहेब दुय्यम निबंधकांनी दिली.