Uncategorized

भाजपच्या तालुकाध्यक्षावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा : दीपक चंदनशिवे

कासेगाव येथील जागेवर स्टेडियमचे आरक्षण असल्याचा व सदर जागा बेकायदेशीररित्या विक्री झाल्याचे सादर केले पुरावे

पंढरपूर :- पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीतील गट नंबर १४/१अ/२/अ ही ८ एकर जागा वीस वर्षांपूर्वी नगरपालिका प्राधिकरणाने पंढरपूर शहरातील खेळाडूंसाठी स्टेडियम उभे राहावे यासाठी सदर जागेवर स्टेडियमचे आरक्षण व जुनी शर्त असतानाही प्लॉटिंगसाठी डेव्हलप करून या जागेची बोर्ड लावून विनापरवाना विक्री केली जात आहे. या प्रकरणी भाजपा तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आरपीआय नेते दीपक चंदनशिवे यांनी केली आहे.


सदर जागेचे खरेदी-विक्रीची चौकशी करण्याची मागणी दीपक चंदनशिवे यांनी चार दिवसापूर्वी निवेदनाद्वारे केली होती. या विरोधात भाजप तालुकाध्यक्ष भास्कर कस गावडे यांनी पत्रकार परिषद घेत दीपक चंदनशिवे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र या पत्रकार परिषदेत भास्कर कसगावडे जागेवर आरक्षण नसल्याबाबत किंवा बेकायदेशीर खरेदी विक्री झाल्याबाबत एकही पुरावा देऊ शकले नाहीत.

या विरोधात दीपक चंदनशिवे यांनी पत्रकार परिषद घेत जागेवर आरक्षण असल्याची कागदपत्र सादर केली.
प्रांत अधिकाऱ्याची परवानगी टाळण्यासाठी दहा गुंठ्याप्रमाणे जागा विकता यावी. यासाठी भाजपा तालुका अध्यक्ष पदाचा दबाव टाकून जागेच्या उताऱ्यावर जिरायत ज्वारी जमीन असा उल्लेख असतानाही बागायत जमीन म्हणून विक्री केली आहे. खरेदी देताना जागा मालकाने जागेवर कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही असे प्रतिज्ञापत्र दिले आहेत. झोनल दाखला न जोडल्याने दुय्यम निबंधक अधिकाऱ्याची व खरेदी करणाऱ्या नागरिकाची फसवणूक करून जागा विकण्यात आली असल्याचा आरोप दीपक चंदनशिवे यांनी केला आहे.
यामुळे जागेचे मालक भाजपाचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व सदर आदेश व खरेदी व्यवहार रद्द करण्यात यावेत.
यासाठी न्याय मागण्यासाठी लवकरच पंढरपूर तहसील कार्यालयासमोर खेळाडू व नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा आरपीआयचे दीपक चंदनशिवे यांनी पंढरपूर येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

यावेळी त्यांनी भाजपा तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे यांच्याकडून सदर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत त्यांच्यापासून आपल्या जीवितास धोका असल्याने पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे.
यावेळी त्यांनी माध्यमांसमोर सदर जागेवर स्टेडियमचे आरक्षण असल्याचा व खरेदी देताना जिरायत शेत जमीन बागायत असल्याचा उल्लेख केल्याचा तसेच झोनल दाखला न जोडता खरेदी देताना जागेवर आरक्षण नसल्याचे स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र जागा मालकाने दिल्याचा पुरावा माध्यमांसमोर सादर केला आहेत.
यावेळी त्यांनी सदर जागेच्या उताऱ्यावर पतसंस्थेचे कर्ज असतानाही पतसंस्थेकडून जागा विकण्यास परवानगी असल्याचा दाखला देण्यात आल्याने याचीहि सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
याबाबत आपण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जागेवर आरक्षण असतानाही खरेदी देताना जागेवर आरक्षण नाही असे प्रतिज्ञापत्र जागा मालकाकडून देऊन नागरिकांची फसवणूक केली आहे. सदर जागेच्या उताऱ्यावर जिरायत जमीन असा उल्लेख असतानाही प्रांत अधिकाऱ्याची परवानगी टाळण्यासाठी बागायत जमीन म्हणून विक्री करण्यात आली आहे. याबाबतचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. लवकरच मी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर भाजपच्या तालुकाध्यक्षावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा व सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचे दीपक चंदनशिवे यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close