जलतरण तलावात मृत्यूप्रकरणी पंढरपूर नगरपालिका आणि ठेकेदाराला न्यायालयाचा दणका.
मयत सूयोग संगितराव मृत्यूप्रकरणी अकरा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश.
पंढरपूर :- पंढरपूर नगरपालिकेच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्या प्रकरणी पंढरपूर न्यायालयाने मयत सुयोग संगीतराव यांच्या कुटुंबीयांना पुढील तीन महिन्यात सहा टक्के व्याज दराने 11 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. 2010 मध्ये सुयोग संगीतराव याचा जलतरण तलावात बुडून मृत्यु झाला होता.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने 2010 मध्ये जलतरण तलाव सुरू करण्यात आला होता. या जलतरण तलावाचा ठेका पुणे येथील कंपनी क्रिस्टल टूल्स अँड प्लाझा या कंपनीकडे देण्यात आला होता. सुयोग संगीत राव हा तरुण या जलतरण तलावामध्ये पोहताना मृत्युमुखी पडला होता. या विरोधात सुयोगच्या पालकांनी पंढरपूर न्यायालयात दाद मागितली होती. यामध्ये पंढरपूर नगरपालिका, जलतरण तलावाचे काम करणारे श्रीहरी पंचवाडकर, जलतरण तलाव चालवणारी कंपनी क्रिस्टल पूल्स अँड प्लाझा , कंपनीचे मालक निलेश शुक्ल यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने पंढरपूर नगरपालिका, क्रिस्टल पूल्स अँड प्लाझा, कंपनीचे मालक निलेश शुक्ल यांना पुढील तीन महिन्यात सहा टक्के व्याजदराने 11 लाख रुपये संगीतराव कुटुंबांना देण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाच्या या दणक्याने पंढरपूर नगरपालिकेमध्ये अनागोंदी कारभार चालतो यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
सुयोगच्या कुटुंबाच्या वतीने ऍड. अल्ताफ शहाणूरकर यांनी बाजू मांडली होती. तब्बल 14 वर्षे चाललेल्या या खटल्यामध्ये अखेर सुयोगच्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे.