माझ्या पायागुणा मुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले – पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांचा दावा
पंढरपूर :- पंढरपूर – मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये माझा विजय झाला. आणि माझ्या पायगुणामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले व महायुती सत्तेत आली असा अजब दावा पंढरपूरचे भाजप आमदार समाधान आवताडे यांनी केलाय. सध्या मतदारसंघात आमदार समाधान आवताडे यांच्या वतीने हजारो महिलांसाठी रक्षाबंधन व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी वरील दावा केला आहे.
माझ्या पायगुणामुळे महाविकास आघाडीचे सरकार गेले आणि महायुती सत्तेत आली. महायुती सत्तेत आल्यानंतर शेतकरी महिला मजूर यांच्यासाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. हे सरकार सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार समाधान अवताडे यांना विजयी करा मी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडतो असे आवाहन केले होते. हाच धागा पकडून आमदार समाधान आवताडे यांनी हे वक्तव्य केले का? अशी चर्चा सुरू आहे.