Uncategorized

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या दलित, मुस्लिमांच्या प्रतिनिधींना वगळून पंढरपूर विधानसभेचे इच्छुक शरद पवारांच्या भेटीला.

नेत्यांनीच मांडली दलित मुस्लिमांची भूमिका

पंढरपूर :- लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा तगडा सामना राज्यामध्ये झाला. दलित मुस्लिमांच्या मतांवर काँग्रेस , राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरेंच्या शिवसेनेने बाजी मारली. भाजपच्या ताब्यात असलेले सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा हे दोन्ही मतदार संघ एक हाती महाविकास आघाडीच्या ताब्यात आले. मात्र आता पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षातून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी दलित, मुस्लिम प्रतिनिधींना वगळून आज बारामती येथे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. फक्त निवडणुकीमध्ये दलित, मुस्लिम मतदारांच्या पुढे पुढे करणारे तथाकथित नेत्यांबद्दल आता दलित मुस्लिम मतदारांमध्ये नाराजी पसरली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण देशात भाजप संविधान बदलणार यावरून दलित आणि मुस्लिम समाजामध्ये भीतीचे वातावरण होते. देशात दलित आणि मुस्लिम समाजाने काँग्रेस , इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडीला एकतर्फी मतदान करून भाजपाला बहुमता पासून रोखले. तर राज्यात माहितीची दाणादाण उडवली.
राज्यात दलित मुस्लिम मतदारांसोबत जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या भूमिकेचे समर्थन करणाऱ्या मराठा समाजाने देखील महाविकास आघाडीला भरभरून मतदान केले. त्यामुळे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघात काँग्रेसचा प्रणिती ताई शिंदे आणि राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले.
लोकसभा निवडणुकीनंतर आता पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील नेत्यांना विधानसभेची स्वप्न पडू लागली आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सर्वात जास्त पसंती आहे. आज पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार वसंत नाना देशमुख, माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत , धनगर समाजाचे नेते आदित्य फत्तेपुरकर यांनी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांची एकत्रित भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेमध्ये पंढरपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची यावर विचार विनिमय करण्यात आला.
मात्र या बैठकीदरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या दलित आणि मुस्लिम समाजाचा एकही प्रतिनिधी उपस्थीत नव्हता. उपस्थित नेत्यांनीच लोकसभा निवडणुकीचे श्रेय स्वतःच्या खांद्यावर घेऊन आपणच किंगमेकर असल्याची भूमिका शरद पवारांपुढे मांडल्याचे कळते. निवडणुकीपूर्वीच दलित आणि मुस्लिमांचा विसर पडल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची वाट अवघड असल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही समाजामध्ये या इच्छुक उमेदवारांबद्दल असंतोष निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close