विधानसभा निवडणुकीपूर्वी परिचारक-भालके एकत्र ! भगीरथ भालके यांच्या उपस्थितीत परिचारकांचा भावी आमदार म्हणून उल्लेख.
पंढरपूर प्रतिनिधी:- लखन सर्वगोड
पंढरपूर :- राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले भगीरथ भालके यांनी मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. याच मतदारसंघातून माजी आमदार प्रशांत परिचारक देखील इच्छुक आहेत. मात्र एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे भालके – परिचारक आज मंगळवेढ्यात एकाच व्यासपीठावर आले होते. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारच्या माध्यमातून 94 कोटी रुपये कर्ज मिळवून दिल्याबद्दल माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा सत्कार ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला युवक नेते भगीरथ भालके हे जनआशीर्वाद यात्रा सोडून उपस्थित होते. भालके आणि परिचारक यांचा एकच हार घालून यावेळी सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी आयोजकांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा भावी आमदार असा उल्लेख केला.
यावेळी बोलताना भगीरथ भालके म्हणाले की, कार्यक्रम सुरू असताना पाऊस सुरू आहे हे मंगळवेढ्यासाठी शुभ संकेत आहेत. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी त्यांच्या सरकारला धारेवर धरून कारखान्याला मदत मिळवून दिली. ही मदत मिळू नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले होते. अशी नाव न घेता येते का त्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्यावर केली. दोन वर्षांपूर्वी भालके आणि परिचारक यांनी संत दामाजी साखर कारखान्याच्या निवडणुकीत समविचारी आघाडीची स्थापना केली होती. आज मी कार्यक्रमाला आलो नसतो तर काहींनी वेगळा अर्थ काढला असता. म्हणून जन आशीर्वाद यात्रा सोडून मी कार्यक्रमाला आलो.
यावेळी भगीरथ भालके यांनी राज्य सरकारवर टीका करणे टाळले. मी सरकारवर टीका केली तर प्रशांत परिचारकांना अडचणी अशी मिष्कील टिप्पणी यावेळेस त्यांनी केली.