शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत परिचारकांचे शिलेदार शरद पवारांच्या भेटीला.
पंढरपूर प्रतिनिधी :- लखन सर्वगोड
पंढरपूर :- पंढरपुरातील परिचारक गटाचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर, तसेच परिचारकांचे शिलेदार असणारे संजय अभ्यंकर, रा.पा कटेकर यांनी आज सुभाष भोसले यांच्यासोबत शरद पवारांची भेट घेतली. काही दिवसापूर्वी बार्शी येथे या सर्व मंडळींनी पवारांची भेट घेतली होती. मात्र आता पुन्हा पवारांच्या भेटीला सुभाष भोसले यांच्या सोबत परिचारकांचे शिलेदार गेल्याने माजी आमदार प्रशांत परिचारक हे राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. यामुळे पंढरपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
या भेटीने राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडून इच्छुक असणारे युवक नेते भगीरथ भालके, वसंत नाना देशमुख, अनिल दादा सावंत, नागेश भोसले यांना धक्का मानला जातोय.
परिचारकांचे निष्ठावंत म्हणून लक्ष्मण पापरकर यांची ओळख आहे. पापरकर यांचे सर्व पक्षीय नेत्यांशी जरी स्थानिक पातळीवर संबंध असले. तरी राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर पापरकर कायमच परिचारकांचा झेंडा मोठा करत आले आहे. त्या दृष्टीने वापरकर यांची दुसऱ्यांदा शरद पवारांची होणारी भेट परिचारक गटासाठी आणि आगामी विधानसभेसाठी महत्त्वपूर्ण मानली जाते.
सुभाष भोसले यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी. असे ” गोंडस कारण ” पुढे करून जरी परिचारकांचे शिलेदार शरद पवारांना भेटत असले. तरी आगामी काळात परिचारक गटाचे तुतारी वाजवण्याचे मनसुबे लपून राहिले नाहीत. त्यामुळे पवारांकडे साखरपेरणी करण्याच्या दृष्टीने शिलेदारांची मोहीम आगामी राजकारणासाठी टर्निंग पॉईंट देणारी आहे.
मागील आठवड्यात सुभाष भोसले यांनी प्रशांत परिचारक यांची भेट घेतली. अशी जरी सूत्रांची माहिती असली. तरी भोसलेंच्या नेतृत्वात नवे छुपे राजकीय अजेंडे राबवण्यासाठीचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचे चित्र आहे.
भोसले यांच्यासोबत संदीप मांडवे देखील पवारांच्या दरबारात होते. सुभाष भोसले, संदीप मांडवे हे गेल्या काही दिवसा पूर्वी अभिजीत पाटलांशी सलगी करून होते. मात्र अभिजीत पाटलांनी आपला मोर्चा माढ्याकडे वळवल्याने आता पंढरपूर मंगळवेढ्यासाठी तुतारीचा संभाव्य दावेदार म्हणून पांडुरंग परिवाराशी दोस्ताना करण्याचा प्रयत्न मांडवे आणि भोसले यांचा दिसत असल्याची चर्चा आहे.