समविचारी परिचारकांचा भगिरथ भालके यांना डबल धक्का ; दोन शिलेदार फोडले.
पंढरपूर प्रतिनिधी :- लखन सर्वगोड
पंढरपूर :- पंढरपूर विधानसभा मतदार संघात प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मनोमिलनाने भाजपची ताकद वाढली आहे. मंगळवेढ्यात भगीरथ भालके यांच्यासोबत समविचारी आघाडीत असणारे प्रशांत परिचारक यांनी पंढरपुरात काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना डबल धक्का दिलाय. पंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा उज्वला भालेराव आणि माजी नगरसेवक महादेव धोत्रे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केलाय. यामुळे साहजिकच आमदार समाधान आवताडे यांची ताकद वाढली आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून भगिरथ भालके यांना उमेदवारी मिळावी म्हणून पवारांच्या भेटीला गेलेल्या शिष्टमंडळामध्ये महादेव धोत्रे आणि ऋषिकेश भालेराव यांचा समावेश होता. मात्र प्रचाराचे रणधुमाळी सुरू झाल्यानंतर या दोघांनी देखील भगीरथ भालके यांची साथ सोडली आहे. मंगळवेढा मध्ये समविचारी आघाडीच्या अजित जगताप यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी अवताडेंना समर्थन दिले आहे. आता परिचारकांनी पंढरपुरात पालखींना दुहेरी धक्का दिला आहे.