बोगस महिला उभी करून विधवा महिलेची जागा हडपली. पंढरपुरातील नामांकित बिल्डर, एजंट सह चार जणांवर गुन्हा दाखल.
पंढरपूर प्रतिनिधी :- लखन सर्वगोड
पंढरपूर:- विधवा महिलेची जमीन हडपण्याचा प्रकार पंढरपूरमध्ये उघडकीस आला आहे. बोगस महिला उभी करून या जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याप्रकरणी पंढरपुरातील नामांकित बिल्डर आणि एजंट सह चार जणांवर न्यायालयाच्या आदेशाने गून्हा दाखल झाला आहेत.
यात हकीकत आशि की,
श्रीमती हर्षदा हेमंत शुक्ल नामक विधवा महिलेचा मौजे इसबाबी पंढरपूर नगरपालिका हद्दीतील गट क्रमांक ११९/४ प्लॉट क्रमांक ५९ यासी एकूण क्षेत्र २७८.८५ चौ. मी ही जागा सन 2001 साली फिर्यादी यांनी खरेदी केलेली होती. परंतु सदर महिला वयोवृद्ध असल्याकारणाने तिचे सदर जागेकडे जाणे- येणे कमी असल्याचा गैरफायदा घेऊन यातील आरोपी यांनी संगणमत करून श्रीमती हर्षदा शुक्ल यांचे बनावट आधार कार्ड व इतर कागदपत्रे तयार करून पंढरपूर दुय्यम निबंधक कार्यालय येथे त्यांचे जागी कोणीतरी बनावट महिला उभी करून दिनांक १/०७/२०२२ रोजी दस्त क्रमांक 3145 या दस्ताने सरस्वती मसू माने या महिलेच्या नावावरती सदर प्लॉट खरेदी केला तदनंतर दिनांक २६/८/२२ रोजी दस्त क्रमांक ४०२९ ने सरस्वती माने हीचे नावावरून राजू विठ्ठल खंडाळे याचे नावे सदर प्लॉट केला व त्यानंतर सदर जागेवरती बेकायदेशीरपणे आरसीसी बांधकाम केले. या प्रकरणी पोलिसानी दखल न घेतल्याने फिर्यादी महिला यांनी ॲडव्होकेट इंद्रजीत परिचारक यांचे मार्फत न्यायालयात भारतीय नागरी सुरक्षा संहिता नुसार खाजगी फिर्याद दाखल केली. फिर्यादी यांचे वकिलाचा युक्तीवाद कागदपत्रे व सर्वोच्य न्यायालयाचे न्याय नीवाडे ग्राहय्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती के.जे. खोमणे यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १७५ (३) प्रमाणे तपास करून कोर्टात सदर गुन्ह्याचा रिपोर्ट सादर करणेबाबत आदेश पारित केले. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(१), ३१८(४), ३३६(१) ,३३६(३) ,३३८ ,३४०(२) ,३(५) अन्वये यातील आरोपी १)सरस्वती मसू माने २) भैय्या बंडू अवघडे ३) अनिता महादेव भालेराव ४) राजू विठ्ठल खंडाळे ५) सुनील औदुंबर पाटोळे ६) शशिकांत दिगंबर आटकळे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तातडीने यातील आरोपी राजू खंडाळे, सुनील पाटोळे, शशिकांत आटकळे या आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दिनांक १९ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश पारित केले या प्रकरणाचा तपास शहर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती खडके पाटील या करत आहेत. याप्रकरणी फिर्यादी महिलेच्या वतीने ॲड.इंद्रजित परिचारक ॲड.ओंकार बूरकुल, ॲड.निखिल चिंचोळकर, ॲड.अतुल मेटकरी हे काम पाहत आहेत.