पंढरपूर मध्ये नियमबाह्य ब्लड बँकेला मंजूरी देण्याचा घातला जातोय घाट.
पंढरपूर प्रतिनिधी :- लखन सर्वगोड
पंढरपूरसह राज्यात नवीन 35 रक्तपेढ्यांना मंजुरी देण्याचा सरकारचा घाट
पंढरपूर :- आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शासनाने विविध कामांना मंजूरी देण्याचा सपाटा लावला आहे. यामध्ये आता राज्यात नवीन 35 रक्तपेढ्यांना मंजूरी देण्याचा घाट आरोग्य विभागाने घातल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पंढरपूर मध्ये देखील एक ब्लड बँकेला नव्याने नियमबाह्य रीतीने परवानगी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोग्य विभागाने नियमबाह्यपणे नवीन रक्त पेढ्यांना मंजूरी देऊ नये, अशी मागणी देखील या निमित्ताने पुढे आली आहे. तसे झाल्यास या निर्णयाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा या क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते वैभव राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे. वैभव राऊत यांनी याबद्दल न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल केली आहे.
वैभव राऊत यांनी आपल्या संस्थेमार्फत पंढरपूर मध्ये रक्तपेढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. पंढरपूरची लोकसंख्या पाहता अस्तित्वात असलेल्या दोन रक्तपेढ्या पुरेशा आहेत. तसे ते रक्त पिढीला मंजुरी देण्यासाठी 200 बेडचे रुग्णालय पाहिजे. अशी कारण देत शासनाने वैभव राऊत यांचा प्रस्ताव फेटाळला होता. मात्र आता अवघ्या 10 बेडचा हॉस्पिटल असलेल्या एका संस्थेला रक्तपेढी मंजूर केल्याचा खळबळजनक दावा वैभव राऊत यांनी केलाय. यामध्ये मोठे आर्थिक हितसंबंध जपले गेल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे.
रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे यासाठी अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून रक्त पेढ्या चालवल्या जातात. सध्या राज्यात 376 रक्तपेढ्या सुरु आहेत. या रक्त पेढ्यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मागणीनुसार रक्त पुरवठा केला जातो. शिवाय रक्तपेढ्यांच्या माध्यमातून रक्त संकलन देखील केले जाते. अशातच आता काही सामाजिक संस्थांनी नवीन रक्त संकलन केंद्र सुरु करण्याची मागणी आरोग्य विभागाकडे केली आहे. यामध्ये राज्यभरातून जवळपास 35 नवीन प्रस्ताव राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे मंजूरीसाठी दाखल झाले आहेत. यामध्ये पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक प्रस्ताव दाखल असल्याची माहिती परिषदेकडून देण्यात आली आहे.
नवीन रक्तपेढी सुरु करण्यासाठी संबंधी संस्था ही शासन मान्य असावी, शिवाय संबंधी संस्थेकडे 200 पेक्षा अधिक बेडचे हाॅस्पिटल असावे ही अट घालण्यात आली आहे. परंतु अनेक संस्थांकडे दोन पेक्षा अधिक बेडचे हाॅस्पिटल नसताना देखील नवीन रक्तपेढीसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आल्याची तक्रार वैभव राऊत यांनी केली आहे.
सरकारने नियमबाह्यपणे नवीन रक्तपेढ्यांना रक्त संकलनासाठी परवानगी दिली तर या निर्णाया विरोधात सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन जाईल असा इशारा वैभव राऊत यांनी दिला आहे.
याबाबत राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक महेंद्र केंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलताना, राज्यात सध्या 376 रक्त पेढ्या सुरु आहेत.यावर्षी नवीन रक्त संकलन केंद्रे सुरु करण्यासाठी राज्यातून सुमारे 35 नवीन प्रस्ताव राज्य रक्त संक्रमण परिषदेकेडे दाखल झाले आहेत. त्या सर्व प्रस्ताव तपासणीचे काम सुरु आहे. तपासणीमध्ये योग्य असलेले प्रस्ताव पुढे मंजूरीसाठी पाठवले जाणार आहेत.
नवीन रक्तपेढी सुरु करण्यासाठी मी सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. तो नामंजूर केला आहे. परंतु सध्या नियमबाह्यपणे अनेक संस्थांना रक्त संकलन सुरु करण्यास परवाणगी देण्याचा आरोग्य विभागाने घाट घातला आहे. शासनाने दिलेल्या नियमानुसारच नवीन रक्त संकलन केंद्राना परवाणगी द्यावी, नियमबाह्यपणे परवाणगी दिल्यास सरकारच्या विरोधात आंदोलन केले जाईल असा इशारा वैभव राऊत यांनी दिला आहे.
———–