भालके आणि परिचारकांना धक्का ; आरपीआय नेत्यासह माजी नगरसेवकांनी हाती घेतलीं तुतारी हातात.
पंढरपूर :- विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये चौरंगी लढत होत आहे. आज काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांना मोठा धक्का बसला आहे. आरपीआयचे युवक नेते परिचारक समर्थक अमित कसबे, माजी नगरसेवक प्रताप गंगेकर, माजी नगरसेवक अक्षय गंगेकर, माजी नगरसेवक शंकर पवार, माजी नगरसेवक संतोष नेहतराव सुरेश नेहतराव, बाळासाहेब नेहतराव यांच्यासह हजारो समर्थकांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांना पाठिंबा देत तुतारी हातात घेतली आहे.
खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. सहा नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे इसबावी पासून अंबाबाई पटांगानापर्यंत भालके आणि परिचारक गटाला धक्का बसला आहे. तर अनिल सावंत यांची ताकद वाढली आहे. पुढील दोन दिवसात आणखी शहरातील मातब्बरांचे पाठबळ अनिल सावंत यांना मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.