आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंतांना शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी.
पंढरपुरात महाविकास आघाडीत बिघाडी
पंढरपूर :- पंढरपुरात समोर आला आहे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळाली आहे यामुळे आता पंढरपुरात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे समोर आले आहे.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून यापूर्वीच काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे.
त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने ही आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते आज अकलूज येथे अनिल सावंत यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.
अनिल सावंत हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात होते त्यांनी पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली होती दरम्यान जागा वाटपामध्ये पंढरपूरची जागा काँग्रेसकडे गेली होती इथून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळताच काँग्रेसचे राष्ट्रवादीच्याही काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे त्यानंतर आता थेट शरद पवारांनी अनिल सावंत यांना मैदानात उतरवले आहे. सावंत यांच्या उमेदवारीमुळे पंढरपूर विधानसभा मतदारसंघात अनेक घडामोडींना वेग आला आहे.
भाजपकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे मनसे कडून दिलीप धोत्रे काँग्रेसकडून भगीरथ भालके आणि राष्ट्रवादी शरद चव्हाण पक्षाकडून अनिल सावंत हे आता पंढरपूरच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे या चौरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे जाता लक्ष लागले आहे.