पंढरपूर पोलिसांची मोठी कारवाई…. चोरीला गेलेल्या सहा मोटरसायकलसह एक ऑटो रिक्षा जप्त .
चार आरोपी अटकेत.
पंढरपूर :- पंढरपूर शहरातून पाच आणि मोहोळ तालुक्यातील एक मोटरसायकलसह एक ऑटो रिक्षा चोरीला गेली होती. पंढरपूर शहर पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत या सहा मोटरसायकली आणि एक रिक्षा जप्त केली आहे. याप्रकरणी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील एक आरोपीसह पंढरपूर मधील तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2024 पासून पंढरपूर शहरात पाच मोटरसायकली आणि एक रिक्षा चोरीला गेली होती. या सर्व चोरींचा तपास पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून सुरू होता. पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या केलेल्या तपासामध्ये अरुण राम भापकर (रा.अकोली तालुका गंगाखेड जिल्हा परभणी) तेजस मोहन परदेशी (रा. लोखंडे वस्ती पंढरपूर) मोहन दगडू पळसे (रा. तपकिरी शेटफळ तालुका पंढरपूर) यांनी या सहा मोटरसायकलींची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तर सांगोला चौक पंढरपूर येथे राहणारे सचिन दत्तात्रय धुमाळ यांच्या मालकीची बजाज कंपनीचे ऑटो रिक्षा शिवरत्न नगर पंढरपूर येथे राहणारा आरोपी आनंदा मधुकर आपले यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी वरील चारही आरोपींना ताब्यात घेतला असून यांच्याकडून 2 लाख 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक गिरीश सरदेशपांडे ,अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर ,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले , वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ , सहाय्यक फौजदार राजेश गोसावी, नागनाथ कदम, पोलीस हवालदार शरद कदम , सुरज हेंबाडे , सीरमा गोडसे , बिपिनचंद्र ढेरे ,नवनाथ माने, सचिन हेंबाडे , पोलीस शिपाई शहाजी मंडले, निलेश कांबळे , समाधान माने , बजरंग बिचुकले आणि सायबर शाखेचे पोलीस अंमलदार योगेश नरळे यांनी केली आहे.