पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारासाठी भाजपचे गुप्त मतदान ; तर परिचारक समर्थकांनी उघडपणे केले उमेदवारीची मागणी
पंढरपूर प्रतिनिधी :- लखन सर्वगोड
लोकसभा निवडणुकीत तोंड भाजल्याने भाजपा ताक देखील फुंकून पिणार
पंढरपूर:- पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी आज मंगळवेढा मध्ये भाजपाच्या वतीने अंतर्गत गुप्त मतदान घेण्यात आले. मतदार संघातील 97 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या गुप्त मतदानामध्ये सहभाग घेतला. पक्ष निरीक्षक आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे गुप्त मतदान पार पडले. मात्र मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परिचारक समर्थक भाजप पदाधिकाऱ्यांनी उघडपणे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना उमेदवारी देण्याची मागणी पक्ष निरीक्षक आमदार लांडगे यांच्याकडे केली.
लोकसभा निवडणुकीमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता पक्षाने उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपने
सावध पवित्रा घेत पदाधिकाऱ्यांचे थेट गुप्त मतदान घेतले आहे.
पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक इच्छुक आहेत. पदाधिकाऱ्यांचा कौल जाणून घेण्यासाठी आज मंगळवेढ्यामध्ये गुप्त मतदान पार करणे. यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पंढरपूर तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवेदनाद्वारे भाजपा समर्थक पदाधिकारी पंढरपूर शहर व तालुका भाजपा अध्यक्ष विक्रम शिरसट, भास्कर कसगावडे, माऊली हळवणकर, प्रशांतभैय्या देशमुख, नगरसेवक अनिल अभंगराव, गुरुदास अंभ्यकर, लाला पानकर, नारायण सिंघण,रणजित भोसले, सुनिल भोसले,अरूण घोलप,आदींनी आमदार महेशदादा लांडगे यांच्याकडे प्रशांत परिचारक यांना पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा निवडणूकीसाठी भाजपा महायुतीच्या उमेदवारीची मागणी केली.
एकीकडे पक्षाने गुप्त मतदान घेतलेले असतानाच भाजप पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे आता भाजप गुप्त मतदानाच्या आकडेवारीवर निर्णय घेणार की हे गुप्त मतदान फार्स ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.