भाजपच्या “या” जेष्ठ नेत्यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठींबा
माढ्यात भाजपचे समीकरण बिघडले
पंढरपूर :- माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच भारतीय जनता पार्टीला माळशिरस तालुक्यातील मोठा धक्का बसलाय. भारतीय जनता पार्टीचे जुने, जाणते ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला आहे. भारतीय जनता पार्टीला माळशिरस तालुक्यातून हा मोठा धक्का मानला जातोय.
भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील यांनी 1990 पासून माळशिरस तालुक्यामध्ये भाजपचे कमळ फुलवण्यासाठी प्रयत्न केला. मोहिते पाटलांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने ते समर्थपणे उभे राहिले. मात्र 2014 नंतर सत्ता येऊन ही सुभाष अण्णा पाटील यांच्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केलं गेलं. याची सल सुभाष अण्णा पाटील समर्थकांमध्ये होती. तब्बल 30 वर्षाचा राजकीय विरोध संपून सुभाष अण्णा पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा दिला आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच सुभाष अण्णा पाटील यांनी मोहिते पाटलांना समर्थन दिल्याने भाजप भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत.