Uncategorized
मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच धनगर शिष्टमंडळात फुट. आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर मध्ये यावे.
पंढरपूर :-पंढरपूर येथील धनगर आरक्षण शिष्टमंडळामध्ये फूट पडली आहे. या शिष्टमंडळातील दोन सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईत होणाऱ्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.
धनगर शिष्टमंडळातील सदस्य आदित्य फत्तेपूरकर आणि विठ्ठल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.
धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या सात दिवसांपासून पंढरपुरात राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज मुंबईत दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीसाठी दहा जणांचे शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहेत. दरम्यान बैठकी पूर्वीच शिष्टमंडळामध्ये फूट पडल्याचे समोर आले आहे. आदित्य फत्तेपूरकर आणि विठ्ठल पाटील यांनी उपोषणकर्त्यांसोबत थांबण्याचा निर्णय घेतला आहे.