माजी खासदार अमर साबळे यांनी पुण्यातून फुंकले सोलापूर लोकसभेचे रणशिंग.
पुण्यात राहणाऱ्या सोलापूरकरांचा आज होणार मेळावा.
पंढरपूर :- सोलापूर लोकसभा मतदार संघातील भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. याचं दरम्यान माजी खासदार अमर साबळे यांनी आपली उमेदवारी पक्की असल्याचे गृहीत धरून आपल्या प्रचाराचे रणशिंग पुणे येथून फुंकले आहे. सोलापूर भागातील जे मतदार पुण्यात राहतात त्यांच्याशी हितगुज करण्यासाठी आज शनिवार ९मार्च रोजी सायंकाळी ५:३०वाजता पुणे निवासी सोलापूरकर स्नेहमेळावा आयोजित केलेला आहे. अमर साबळे यांनी थेट पुण्यातून प्रचाराचे रणशिंग फुंकल्याने साबळे यांचीच उमेदवारी पक्की समजली जात आहे.
सोलापूर लोकसभेसाठी भाजपा कडून खासदार सिद्धेश्वर स्वामी, अमर साबळे, राजेश मुगळे, लक्ष्मण ढोबळे यांनी उमेदवारीची मागणी केलीय. सर्वजण आपल्या नेत्यांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. अशातच माजी खासदार अमर साबळे यांना उमेदवार मिळण्याची दाट शक्यता आहे. साबळे यांनी थेट पुण्यातून प्रचाराला सुरवात केलीय. सोलापूर लोकसभेचे समन्वयक म्हणून अमर साबळे यांनी सहा महिन्यापासून मतदार संघ पिंजून काढलाय. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास निवडणूक सोपी जाईल असं भाजपा नेत्यांना वाटतं आहे. यामध्ये एक पाऊल पुढे टाकत अमर साबळे यांनी थेट प्रचाराला सुरवात केली आहे.
त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधुक वाढलीय.