फलटण – पंढरपूर महामार्गावर कार आणि टेम्पोच्या अपघातात चार जण ठार.
तीन जण गंभीर जखमी.
मयतांमध्ये आई आणि मुलाचा समावेश
पंढरपूर:- फलटण – पंढरपुर मार्गावरील कारूंडे (ता.माळशिरस) येथे पुलावर झालेल्या कार व टेम्पोच्या अपघातात चार जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.मयतांमध्ये आई आणि मुलाचा समावेश आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की , लासूर्णे (ता.इंदापूर ) येथील राजेश शहा हे आपल्या कामगारांना घेऊन सातारा येथील कासपठार पाहण्यासाठी निघाले होते. ते नातेपुते येथून राॅगसाईडने निघाल्याने हा अपघात लासूर्णे येथुन फक्त २० किमी अंतरावर असणाऱ्या कारूंडे (ता.माळशिरस) येथील पुलावर घडला.
यामध्ये राजेश अनिल शहा (वय ५५), दूर्गेस शंकर घोरपडे (वय २८), कोमल विशाल काळे (वय ३२), शिवराज विशाल काळे (वय १०) हे जागीच ठार झाले तर या अपघातात आकाश दादा लोंढे (वय २५), पल्लवी बसवेश्वर पाटील (वय ३०), अश्वीनी दूर्गेश घोरपडे हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.