मनसेने प्रचाराचा नारळ फोडला पुण्यात. पुण्यात स्थायिक झालेल्या पंढरपूरकर मतदारांना स्वतः भेटले राज ठाकरे.
राग ठाकरे यांच्या भेटीने पुणेरी पंढरपूरकर सुखावली
पंढरपूर :- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होतात दिलीप धोत्रे कामाला लागले आहेत. आपल्या प्रचाराला देखील त्यांनी सुरुवात केली असून प्रचाराचा नारळ थेट पुण्यामध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत फोडल्याची चर्चा आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मनसेच्या वतीने दिलीप धोत्रे यांना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली.
त्यानंतर धोत्रेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुण्यामध्ये स्थायिक झालेल्या पंढरपूरकरांनी स्नेह मेळावा आयोजित केला होता. या स्नेह मेळाव्यामध्ये दिलीप धोत्रे यांच्या विजय बद्दल सांगोपांग चर्चा करण्यात आली. पुण्यात स्थायिक झालेल्या पंढरपूरकरांना राज ठाकरे यांना समक्ष भेटण्याची गेले अनेक वर्ष झालं तीव्र इच्छा होती. पुण्यामध्ये मेळावा सुरू असताना अचानकपणे राज ठाकरे यांनी मेळाव्याच्या ठिकाणी भेट दिली. साक्षात राज ठाकरे मेळाव्यात अवतरल्याने सर्वांना सुखद धक्का बसला. यावेळी राज ठाकरे यांनी पुणेरी पंढरपूरकरांशी संवाद साधला. पंढरपूर आणि पुण्याच्या विकासाबाबत चर्चा केली. यावेळी दिलीप धोत्रे मित्र परिवाराकडून दिलीप धोत्रे यांना आता आमदारच लिहिलेली प्रतिमा भेट दिली.
पुणेरी पंढरपुराकरांशी थेट राज ठाकरे यांनी संवाद साधल्याने मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचाराचा शुभारंभ पुण्यातून झाल्याचे मानले जात आहे.