राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील यांची पक्षातून हकालपट्टी.
पंढरपूर प्रतिनिधी :-लखन सर्वगोड
पंढरपूर :- राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. माढ्यात आमदार पुत्र अपक्ष उमेदवार रंजीत शिंदे यांना समर्थन दिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचे कारण देत पदावरून हकालपट्टी आणि पक्षातून निलंबन केलं आहे.
माढा विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिजीत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गणेश पाटील हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष असताना देखील त्यांनी अपक्ष उमेदवार रंजीत शिंदे यांना जाहीर सभा घेऊन पाठिंबा दिला होता.
आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची टेंभुर्णी येथे सभा होती. ही सभा संपण्यापूर्वीच गणेश पाटील यांचे पक्षातून हकालपट्टी केली आहे.