Uncategorized

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून “या” उमेदवाराबद्दल लवकरच घेणार निर्णय-प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती

ऐका या व्हिडिओच्या माध्यमातून

पंढरपूर :- आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे उमेदवारी देण्यास संदर्भात सर्व प्रमुख नेत्यांची चर्चा करून निर्णय घेणार असल्याची महिती राष्ट्रवादी एस पी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून अनिल सावंत यांना उमेदवारी देण्याचे संकेत यावेळी जयंत पाटलांनी दिल्याचे बोलले जात आहे.

भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत हे उघडपणे टेंभुर्णी येथील राष्ट्रवादीच्या जाहीर मेळाव्यात व्यासपीठावर दिसून आले. तसेच त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत म्हसवड ते टेंभुर्णी असा प्रवास केला . जयंत पाटील यांच्या या वक्तव्याने पंढरपूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी एस पी पक्षाचे अनिल सावंत अशी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बाईट :- जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी एस पी)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close