Uncategorized

पंढरपूरच्या कट्टर भाजप समर्थकांचा गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. सोशल मीडियावर मोठमोठ्या गप्पा मारणारे मतदानात फेल.

माऊली हळणवार, सुभाष मस्के, भास्कर कसगावडे, संग्राम अभ्यंकर आणि विक्रम शिरसाट ठरले अपयशी

पंढरपूर :- गेली दहा वर्ष केंद्रात आणि राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीची सत्ता आहे. असे असताना देखील लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभेच्या जागा भाजपला गमवाव्या लागल्या आहेत. याला पक्षाच्या वरिष्ठांच्या आत्मविश्वासाबरोबरच गावात गल्लीत काम करणाऱ्या भाजप समर्थकांचा गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा ही वृत्ती कारणीभूत ठरली आहे. भाजपाच्या शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्याबरोबरच राज्य पातळीवर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या गावांमध्ये कुठे तुतारीला तर कुठे पंजाला मतधिक्य मिळाला आहे.

भाजपच्या तालुकाध्यक्षांच्या गावात 991 मतांची पंजाला आघाडी

पंढरपूर तालुका हा सोलापूर आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागला आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे यांचे होमपीच असलेल्या बोहाळी गावामध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना तब्बल 991 मतांचे मताधिक्य मिळाल आहे. या गावात तीन मतदान केंद्र होती. बूथ क्रमांक 25 मध्ये प्रणिती शिंदे यांना 481 तर राम सातपुते यांना 170, बूथ क्रमांक 26 मध्ये प्रणिती शिंदे यांना 461 तर राम सातपुते यांना 147 आणि बूथ क्रमांक 27 मध्ये प्रणिती शिंदे यांना तब्बल 523 राम सातपुते यांना 157 मतांचे लीड मिळाल आहे. त्यामुळे भास्कर कस गावडे यांना आपल्या गावातूनच पक्षाला लीड देण्यास सपशेल अपयश आले आहे. विशेष म्हणजे भास्कर कसगावडे हे श्री सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. तसेच ते कट्टर परिचारक प्रेमी म्हणून ओळखले जातात.

भाजप शहराध्यक्षांनी दिल बोटावर मोजण्या इतकं लीड

भाजपचे शहराध्यक्ष असलेले माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांच्या प्रभागामध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना 2 हजार 832 मतदान मिळालं. तर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना 2 हजार 911 मते मिळाली. शहराध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी स्वतःच्या प्रभागातून अवघड 79 मतांचं लीड भाजप उमेदवाराला दिला आहे. पंढरपूर नगरपालिकेपासून राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना देखील शहराध्यक्षांना मात्र पक्षाच्या उमेदवाराला मत मिळवण्यात या ठिकाणी अपयश आल्याचे दिसत आहे.

माऊली हळणवर, सुभाष मस्के सपशेल अपयशी

आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक, भाजप किसान मोर्चाचे राज्य सरचिटणीस आणि कट्टर शरद पवार विरोधक म्हणून ओळख असणारे माऊली हळणवर यांच्या ईश्वर वठार गावात शरद पवार यांच्या तुतारीने बाजी मारल्याचे दिसत आहे. या ठिकाणी शरद पवारांच्या तुतारी चिन्हाला 182 मतांचे लीड मिळाल आहे. ईश्वर वठार गावातील 283 क्रमांकाच्या बूथवर धैर्यशील मोहिते पाटील यांना 260 तर रणजीत सिंह निंबाळकर यांना अवघे 170 मतदान झाले आहे. तर 284 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर धैर्यशील मोहिते पाटील यांना 216 तर रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना अवघी 124 मते मिळाली आहेत. कट्टर शरद पवार विरोधक असलेल्या माऊली हळणवर हे कायम भाजपच्या समर्थनार्थ किल्ला लढवत असतात. यामध्ये त्यांचा प्रमुख रोख हा खासदार शरद पवार यांच्यावर असतो. मात्र त्यांच्याच गावातून शरद पवार यांनाच जास्त मतदान झाल्याचे दिसत आहे.

आमदार गोपीचंद पडळकर आणि परिचारक यांचे समर्थक सुभाष मस्के यांच्या गोपाळपूर गावामध्ये देखील पंजाला 37 मतांची आघाडी मिळाली आहे. सुभाष मस्के यांच्या गावातील बुथ क्रमांक 114 वर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना 369 तर भाजपच्या राम सातपुते यांना 343 मते मिळाली आहेत. बूथ क्रमांक 115 वर काँग्रेसला 338 तर राम सातपुते यांना 383 आणि बुथ क्रमांक 116 वर काँग्रेसला 437 तर राम सातपुते यांना 381 मतदान झाले आहे. गोपाळपूर गावातून काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना 37 मतांची आघाडी मिळाली आहे.

भाजपला आघाडी मिळवून देण्याच्या पक्षनेते संग्राम अभ्यंकर यांच्या वल्गना विरल्या हवेत

भाजपच्या विचारांचे कट्टर समर्थक आणि परिचारकांचे उजवे हात मानले जाणारे पंढरपूर नगरपालिकेचे पक्षनेते संग्राम अभ्यंकर यांच्या प्रभागात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना तब्बल 410 मतांची आघाडी मिळाली आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना 2 हजार 333 तर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना 1923 मत मिळाली आहेत. नगरपालिकेचे पक्षनेते म्हणून संग्राम अभ्यंकर यांच्याकडून किमान त्यांच्या प्रभागात तरी भाजपाच्या उमेदवाराला आघाडी मिळणं अपेक्षित होतं.
भाजपच्या विचारांचे कट्टर समर्थक असताना देखील या विचारांचा, विकासाचा “अर्थ” मतदारांपर्यंत अभ्यंकर यांना पोहोचवता आला नाही. तो विकास आणि विचार त्यांच्या पुरता मर्यादीत ठेवल्याने त्यांना यश आले नाही अशी चर्चा आता सुरू आहे.

एकंदरीतच वरील भाजपचे आणि परिचारकांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले हे पुढारी विरोधकांवर मर्यादेच्या बाहेर जावून टीका करतात. मात्र यांची अवस्था गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या मराठी सिनेमा सारखी झाल्याची खमंग चर्चा आता पंढरपुरात सुरू आहे. या नेत्यांनी जमिनीवर राहून काम करावं म्हणजे आपल्या गावात आणि प्रभागात तरी पक्षाला यांचा फायदा होईल अशी अपेक्षा पक्षाच्या काही जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close