शरद पवारांनी लोकसभा निवडणुक जिंकण्यासाठी जाती जातीमध्ये विष पेरले – माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा आरोप
देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नेरिटीव सेट केला;
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा खळबळजनक आरोप
पंढरपूर :- ( लखन सर्वगोड) लोकसभा निवडणुक जिंकण्यासाठी शरद पवारांनी जातीयवादाचे विष पेरले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नेरिटीव सेट करण्याचे काम केले, असा खळबळजनक आरोप माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर आज पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाज आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शरद पवार आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला.
लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवारांनी जातीयवादाचे विष पेरून कुटिल राजकारण केले. इंग्रज गेले असले तरी शरद पवार त्यांचे जोडे घालून आज राजकारण करत आहेत. ते कुटनितीचे राजकारण करत आहेत. तोडा , फोडा आणि जोडा ही निती वापरून त्यांनी समाजा समाजामध्ये जातीयवादाचे विष पेरण्याचे काम केल्याचा आरोप ही निंबाळकर यांनी केला. आज बीड मध्ये वंजारी समाज आणि मराठा समाज एकमेकांचे तोंड बघत नाही.
रामराजे नाईक निंबाळकर यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.
फलटण शहरातील सर्व खुनी , दहशतवादी रामराजे यांच्या सोबत फिरतात. दहशतवादी, मोक्का कारवाई झालेले आरोपी, हफ्ते घेणारे सर्वजण त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. शहरात दरोडा पडला तर त्यातील वाटणी घेण्यास देखील ते मागेपुढे पाहत नाहीत अशी जहरी टिका रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.