सोलापूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचा बडा चेहरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील.
पक्ष वाढीला होणार फायदा.
पंढरपूर :- सोलापुर महानगर पालिकेचे माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या रूपाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आंबेडकरी चळवळीचा बडा चेहरा मिळालाय. आज आनंद चंदनशिवे यांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत घड्याळ हातात बांधले. सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून हा प्रवेश पार पडला.
बहुजन समाज पार्टीमधून आनंद चंदनशिवे यांनी राजकारणाला सुरवात केली. 2019 मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम सुरु केले. आज अखेर त्यांनी घड्याळ हातात घेतले.
आनंद चंदनशिवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी प्रथम भेट घेण्यात आली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष कार्यालय येथे भेट झाल्यानंतर दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून सविस्तर चर्चा होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मुंबई येथे उपमुख्यमंत्री व प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत माजी गटनेते आनंद चंदनशिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी, सामाजिक कार्यकर्ते अविनाश भडकुंबे तसेच चंद्रकांत सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सर्व सदस्यांच्या गळ्यामध्ये शाल घालून प्रवेश देण्यात आला.
यावेळी अजित पवार यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व सोलापूर शहरासाठी प्राधान्याने लक्ष ठेवून पक्षीय स्तरावर सर्व कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले.
पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना चंदनशिवे म्हणाले यापूर्वी माझी पालकमंत्री भरणे मामा यांच्या माध्यमातून आपण अजित पवार यांच्या विचारांशी जोडलो गेलो होतो तेव्हापासूनच आपण राष्ट्रवादीचे झालो आता आपण अधिकृत राष्ट्रवादीचे झालो असून सोलापुरात आंबेडकरी समाजामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार रुजवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.