Uncategorized
पंढरपूर तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
काही दिवसांपूर्वी बेकायदेशीर रिव्हॉल्वर बाळगल्या प्रकरणीझाली होती कारवाई.
पंढरपूर :- पंढरपूर शहरातील गणेश रमेश शिंदे ( रा. लक्ष्मी नगर झोपडपट्टी पंढरपूर ) या तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडल्याने एकचं खळबळ माजालीय. सांगोला रोडवरील हॉटेल पंचरत्न शेजारी असलेल्या कोल्ड स्टोरेज जवळ असलेल्या बाभळीच्या झाडाला कमरेच्या बेल्टचा फास आवळल्याचे दिसत आहे. तीन दिवसांपासुन गणेश बेपत्ता असल्याची माहिती पुढे येतं आहे.
गणेशवर काही दिवसांपूर्वी बेकायदेशीर रिव्हॉल्वर बाळगल्या प्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे समजते. तसेच गणेशच्या पत्नीचे देखील काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. मयत गणेशच्या पश्चात एक लहान मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे. गणेशच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केलीय. पुढील तपास पंढरपूर पोलीस करत आहेत.