Uncategorized
गणेश विसर्जन मिरवणुकीचा डॉल्बी जोडत असताना डॉल्बी मालक चक्कर येऊन पडला. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने झाला मृत्यू.
लोकमान्य तरुण मंडळाने गणपतीची मिरवणूक केली रद्द.
पंढरपूर :- गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड जोडत असताना डॉल्बीमालक अमोल खुटाले या तरुणाला अचानक चक्कर आली आणि अमोल कोसळला. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात उपचार सुरू असताना अमोल खुटाले यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथे घडली. यानंतर शहरातील सर्वात मोठे मंडळ असणाऱ्या श्रीमंत लोकमान्य मंडळाने आपला कार्यकर्ता मृत्यू पावल्याने उद्याची आपली गणेश विसर्जन मिरवणूक रद्द केली आहे. अमोलच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे