ग्रॅनाईट फरशी काढण्यासाठी काही कालावधी करता विठ्ठलाचे दर्शन पूर्णपणे बंद राहण्याचीही शक्यता.
विठ्ठल दर्शनाबाबत 13 मार्चच्या बैठकीत होणार महत्त्वपूर्ण निर्णय .
विठ्ठल दर्शनामध्ये होणार मोठे फेरबदल
विठ्ठलाच्या गर्भग्रहातील ग्रॅनाईट फरशी काढण्यासाठी विठ्ठलाचे दर्शन ५० फुटांवरून होणार…?
पंढरपूर :- विठ्ठलाच्या मूर्तीचे जतन आणि संवर्धन व्हावे. यासाठी विठ्ठलाच्या गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी आता काढण्यात येणार आहे. यासाठी विठ्ठलाच्या दर्शन व्यवस्थेमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. विठ्ठलाचे लांबून मुखदर्शन अथवा काही कालावधीसाठी विठ्ठलाचे दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो. याबाबत 12 मार्च रोजी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती , पुरातत्व विभाग यांच्यात एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीतच विठ्ठल दर्शनाबाबत ठोस निर्णय घेतला जाईल. पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार विठ्ठलाच्या गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी काढल्यावर विठ्ठलाच्या मूर्तीचे जतन आणि संवर्धन करण्यास अधिक चालना मिळू शकते. या ग्रॅनाईट फरशीचा विठ्ठल मूर्तीवर परिणाम होत असल्याचा अहवाल पुरातत्व विभागाचा आहे. त्यामुळे हे फरशी काढण्याचे काम कदाचित या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.